Marathi News> सिनेमा
Advertisement

शनी दर्शनाला गेलेली सारा फोटोग्राफर्सवर भडकली

सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.

शनी दर्शनाला गेलेली सारा फोटोग्राफर्सवर भडकली

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खान लवकरच करण जोहर निर्मित 'सिंबा'मध्ये दिसणार आहे. सिनेमा रिलीजच्याआधी अनेक स्टार्ट मंदिर किंवा मस्जीदमध्ये जातात असं पाहायला मिळतं.  नव्या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करायला ती शनी मंदिरात पोहोचली. यावेळी फोटो घेण्यास तिने नकार दिला.

गरिबांना दान  

सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनासाठी ती मुंबईतील शनिदेवाच्या मंदिरात पोहोचली. सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सारा गरीबांना दान करताना दिसतेय.

 

At #Juhu Temple today with brother. #SaraAliKhan

A post shared by Sara Ali Khan (@sakhanofficial) on

तिने मंदिरात तेल चढविले आणि काळं कापडंही दान केलं. पण तिथे उपस्थित फोटोग्राफर्स साराचे फोटो काढत होते. फोटो काढू नका अशी तिने विनंती केली. पण फोटोग्राफर्सने हे ऐकल नाही तेव्हा ती रागावली आणि लगेचच आपल्या कारमध्ये बसून निघून गेली. 

३० नोव्हेंबरला रिलीज

 सारा अली खानचा 'केदारनाथ' सिनेमा ३० नोव्हेंबरला रिलीज होत आहे.. यामध्ये ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार आहे. यानंतर २८ डिसेंबरला ती रोहित शेट्टीच्या 'सिंबा'मधूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Read More