Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत 18 वर्षाच्या तरुणीसोबत सेक्सटॉर्शन, मोबाईलमध्ये एक मेसेज आला अन् सगळं गंडलं

मुंबईत 18 वर्षाच्या विद्यार्थिनीचं सेक्सटॉर्शन करत तिच्याकडून पैसे उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.   

मुंबईत 18 वर्षाच्या तरुणीसोबत सेक्सटॉर्शन, मोबाईलमध्ये एक मेसेज आला अन् सगळं गंडलं

मुंबईत 18 वर्षाच्या विद्यार्थिनीचं सेक्सटॉर्शन करत तिच्याकडून पैसे उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणी इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. वेब सीरिजची ऑफर देत तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यात आलं. यानंतर तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. तसंच तिचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो पाठवत ते सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देण्यात आली. तरुणीने याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

11 जूनला मुलीच्या मोबाईलवर वेब सीरिजची ऑफर देणारा मेसेज आला होता. यामध्ये तिला बेव सीरिजमध्ये काम करण्यास उत्सुक असल्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख भावेश अशी करुन दिली. तसंच आपण निर्माता असून आपला जी एम स्टुडिओ आहे आणि राहुल पटेल दिग्दर्शक असल्याची बतावणी केली. तरुणीने संशय न आल्याने त्यांना कामासाठी होकार कळवला. 

यानंतर तरुणीकडे तिच्या कामाची माहिती मागण्यात आली. तरुणीने आपल्या इंस्टाग्राम  आणि युट्यूबची लिंक पाठवली. आरोपींनी तिला दोन दिवसात वेब सीरिजचं काम सुरु करण्याचं आश्वासन दिलं. तसंच शिवम अगरवाल मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं. यानंतर त्यांनी तिला शिवमशी ओळख वाढव असा सल्ला दिला. 11 जूनला शिवम इंस्टाग्रामवरुन तिच्या संपर्कात आला. 

यानंतर आरोपींनी तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. भावेशने तिला विमानाच्या तिकीटाचे पैसे पाठवण्यास सांगितले. तरुणीने सुरुवातीला 5 हजार आणि नंतर 4 हजार असे 9 हजार पाठवले. 

भावेशने तरुणीला 13 जूनला शिवमसोबत चित्रपट पाहण्यास पाठवलं होतं. चित्रपट पाहून झाल्यानंतर तरुणीला भावेशने फोन केला. शिवम घरी आला नसून, त्याच्याशी संपर्क साध, भेट असं तो सांगत होता. पण तरुणीने आपण बोलणार नाही सांगत नंबर ब्लॉक केला. यानंतर 15 जूनला भावेशने रुपाकडे 40 हजारांची मागणी केली. अन्यथा अर्धनग्न असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करेन अशी धमकी दिली. तिने नंबर ब्लॉक केल्यानंतर तिच्या बहिणीच्या क्रमांकावर हा मेसेज पाठवण्यात आला. अखेर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला. 

Read More