Mumbai's Most Expensive Real Estate Deal : मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केमध्ये मोठा सौदा झाला आहे. 2,02,00,00,000 एवढ्या रुपयांची मुंबईत सर्वात मोठी प्रॉपर्टी डील झाली आहे. एका व्यक्तीने एकाचवेळी तब्बल 12 फ्लॅट खरेदी केली आहे. हे फ्लॅट खरेदी करणाकरी व्यक्ती आहे उदय कोटक. प्रति चौरस फूट 2.71 लाख इतक्या दराने त्यांनी तब्बल 12 फ्लॅट खरेदी केले आहेत.
दक्षिण मुंबईतील वरळी सी फेस (Worli Sea Face area) परिसरात मुंबईतील सर्वात मोठा प्रॉपर्टी व्यवहार झाला आहे. कोटक महिंद्रा बॅंकचे (Kotak Mahindra Bank) माजी CEO उदय कोटक यांनी वरळी सी फेस परिसरात असलेल्या एका इमारतीमधील 12 अल्ट्रा लक्झरी फ्लॅट एकाचवेळी खरेदी केले आहेत. 202 कोटी रुपयांना त्यांनी हे 12 अल्ट्रा लक्झरी फ्लॅट खरेदी केले आहेत. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या या प्रॉपर्टी डीलची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबईच्या वरळी समुद्र किनारा परिसरातील प्रॉपर्टी या सध्या हाय प्रोफाईल प्रॉपर्टी लिस्ट मध्ये येतात. उदय कोटक यांनी वरळी सी फेस परिसरातील एक पूर्ण इमारतच खरेदी केली आहे. या इमारतीत 12 अल्ट्रा लक्झरी फ्लॅट आहेत. हे फ्लॅट 2.71 लाख प्रती चौरस फूट दराने विकले आहेत. या एरियातील मालमत्तेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात विक्रमी दर आहे. यापूर्वी, दक्षिण मुंबईतील अल्टामाउंट रोड आणि भुलाभाई देसाई रोडवर देशातील सर्वात महागड्या दराने प्रॉपर्टी विक्री झाली होती. येथे प्रति चौरस फूट किंमत अनुक्रमे 2.25 लाख आणि 2.09 लाख दराने फ्लॅटची विक्री झाली होती.
उदय कोटक यांनी खरेदी केलेल्या वरळीतील या प्रॉपर्टीची 30 जानेवारी रोजी नोंदणी झाल्याचे समजते. यासाठीचा एक करार 5 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या विक्रमी मालमत्ता खरेदीने भारतीय रिअल इस्टेट बाजारपेठेत एक नवीन बेंचमार्क निर्माण केला आहे.