Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

शाळेतून 4 वर्षीय चिमुकला घरी परतल्यावर आईला म्हणाला, प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होतायेत; अन् समोर आला धक्कादायक प्रकार

शाळेतून 4 वर्षीय चिमुकला नेहमी प्रमाणे घरी आला. पण त्याचा डोळ्यात पाणी होतं. आईने विचारल्यावर सांगितलं की प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत आहे. त्यानंतर धक्कादायक घटना समोर आल्यावर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. 

शाळेतून 4 वर्षीय चिमुकला घरी परतल्यावर आईला म्हणाला, प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होतायेत; अन् समोर आला धक्कादायक प्रकार

नवी मुंबईतील नेरूळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरमधील घटनेनंतर पुन्हा एकदा चिमुकल्यांचा सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 4 वर्षीय चिमुकला नेहमी प्रमाणे शाळेतून घरी परतला. त्याचा डोळ्यात पाणी असल्याने आईने त्याला विचारल्यावर त्याने जे काही सांगितलं त्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. मिळालेल्या माहितीनुसार त्या चिमुकल्याने सांगितलं की, त्याचा प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत आहेत. 

नेमकं काय झालं?

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी शाळेतून घरी परतल्यानंतर मुलाने त्याच्या गुप्तांगात वेदना असल्याची तक्रार केली. पुढे विचारले असता त्याने 'बास अंकल' असा उल्लेख केला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही बदलापूरमध्ये एका सफाई कामगाराने दोन पूर्व-प्राथमिक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती, ज्यामुळे एकच संतापाची लाट उसळली होती. 

शाळेतून परतल्यानंतर मुलाने त्याच्या समस्यांबद्दल तक्रार करायला सुरुवात केली तेव्हा नेरुळची ही घटनाही उघडकीस आली. असं म्हटलं जातंय की मुलाला त्याच्या खाजगी भागात वेदना होत होत्या. आरोपीने मुलावर पेन्सिलसारखी कोणतीही वस्तू वापरली का, याचाही तपास पोलीस करत आहेत. 

बसमधील सीसीटीव्ही फुटेजचा तपास 

पोलीस ज्या स्कूल बसमध्ये मूल प्रवास करत होते त्या स्कूल बसचे सीसीटीव्ही फुटेज तपासत करत आहेत. तसंच, बसमध्ये कोणी महिला परिचारिका उपस्थित होती की नाही याचाही तपास केला जात आहे. आरोपी शाळेच्या आवारात घुसला होता की नाही याचीही शक्यता पोलीस तपासत आहेत. या घटनेनंतर राजकीय पक्षांनी शाळेबाहेर निदर्शनेही केली.

या धक्कादायक प्रकरणात नवी मुंबईतील नेरुळ भागात गुरुवारी रात्री एका स्कूल बस चालकाला चार वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेबाबत पालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आहे. सोमवारी (28 एप्रिल ) सकाळी शाळेबाहेर निदर्शने करण्याची योजना रहिवाशांनी आखली असल्याचं माहिती मिळते आहे. 

दरम्यान एनआरआय कोस्टल पोलिसांनी आरोपी सुजीत दास (25 वर्षे) याला अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, 2012 (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 30  एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read More