Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

शिक्षिकेसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास 'तिने' मन वळवले; दादरमधील 'त्या' शिक्षिकेचे लंडन कनेक्शन समोर


Dadar Teacher News: दादर येथील एका शिक्षिकेने तिच्याच विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.

शिक्षिकेसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास 'तिने' मन वळवले; दादरमधील 'त्या' शिक्षिकेचे लंडन कनेक्शन समोर

Dadar Teacher News: 16 वर्षीय मुलावर अत्याचार करणाऱ्या शिक्षिकेचे कारनामे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दादरमधील नामांकित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेने एका अल्पवयीन मुलाला फूस लावून जबरदस्ती त्याच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तिच्या या कृत्यात तिची एक मैत्रिणदेखील सहकार्य करत असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात तिला मदत करणाऱ्या लंडनमधील महिला डॉक्टरविरुद्धा पोलिसांनी एलओसी जारी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेला 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेची मैत्रिण गेल्या दिवाळीपासून लंडनमध्ये राहते. लैंगिक शोषणामुळं तणावात गेलेल्या पीडित मुलाला समुपदेशन करुन आरोपीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मन वळवले. तसंच, त्याला काही गोळ्यादेखील दिल्या. ही महिला डॉक्टर काही दिवसांसाठी मुंबईतदेखील आली होती.तेव्हा ती पीडित मुलाला भेटली होती. त्यानंतरही फोनच्या माध्यमातून ती त्याच्या संपर्कात होती. आरोपी महिलेच्या मैत्रिणीच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

पोलिसांनी डॉक्टर महिलेशी ई-मेल आणि दुतावासाच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शिक्षिकेच्या सायकॉलॉजिकल टेस्टसह विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. पीडित मुलाचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. लवकरच शिक्षिकेच्या मैत्रिणीलाही अटक करण्यात येणार आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

शिक्षिकेने 24 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान कीर्ती कॉलेज ते सारस्वत कॉलनीसमोरील फुटपाथनजीक कारमध्ये जुहूचे जेडब्लू मॅरियट, विलेपार्ले येथील प्रेसिडेंट व ललित या तीन हॉटेलमध्ये मुलावर लैंगिक अत्याचार केले. इतकंच नव्हे तर मुलालाही दारू पाजून लैंगिक शोशण केल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे. पोलीस आता संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडे चौकशी करताना दिसत आहे. 

Read More