Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Dabba Trading Scam नं शेअर बाजार हादरला! 44,00,00,000 रुपये डब्यात; मोठा घोटाळा उघडकीस

Dabba Trading Scam :  (Mumbai Share Market) मुंबई शेअर बाजार... जिथं दर दिवशी कोट्यवधींची उलाढाल होते, तिथं झालाय एक मोठा घोटाळा. घटनाक्रम पाहून म्हणाल ही कोणा सीरिजचीच स्क्रीप्ट....

Dabba Trading Scam नं शेअर बाजार हादरला! 44,00,00,000 रुपये डब्यात; मोठा घोटाळा उघडकीस

Mumbai Crime News : मुंबई शेअर बाजार. देशाच्या आर्थिक राजधानीत असणारं आर्थिक उलाढालींचं हे केंद्रस्थान. इथं हाती काही नसणारे धनाढ्यही होतात आणि खूप काही असणारे आर्थिक संकटातही सापडू लागतात. अशा या पैशांच्या व्यवहारांमध्ये दर दिवशी कोट्यवधींची उलाढावल होते आणि पैशांचा आलेख वरखाली होतच असतो. याच मुंबईत आता एक असा घोटाळा घडला आहे, ज्यमुळं या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांच्या माथी चिंतेची रेख पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे, ‘डब्बा ट्रेडिंग’.

मुंबई शेअर बाजाराबाहेर असं घडलंय तरी काय?

सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करत चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत मुंबईच्या झवेरी बाजार येथील तीन व्यापाऱ्यांनी अनेकांची फसणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. जिथं तब्बल 10 कोटींची रोकड, आणि 36 किलो सोनं असा साधारण 44 कोटी रकमेचा ऐवज लंपास झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा संपूर्ण ऐवज ‘डब्बा ट्रेडिंग’मध्ये गुंतवण्यात आला होता अशी माहिती लोकमान्य टिळक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करताना देत या व्यापाऱ्यांविरोधात गुंतवणुकदारांनी दिली. रक्कम बुडाल्यानं तोटा झाला, असं कारण व्यापाऱ्यांनी देत हात वर केल्याची माहिती पोलिसांत देण्यात आली आहे.

डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय प्रकार?

शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे कैक प्रकार असून, डब्बा ट्रेडिंग हा त्यातलाच एक प्रकार. जिथं कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय शेअरबाजाराबाहेर बेकायदेशीरित्या ट्रेडिंग केली जाते. यामध्ये ब्रोकरकडून शेअर बाजाराच्या चौकटीबाहेर राहत पैसे गुंतवण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं आणि या व्यवहारांवर कोण्त्याही संस्थेचं नियंत्रण नसतं. परताव्याचा आकडा या पद्धतीच्या ट्रेडिंगमध्ये मोठा असल्याचं भासवत मोठी गुंतवणूक लाटण्याचं सत्र इथं बऱ्याचदा चालतं.

कशा प्रकारे करण्यात आली फसवणूक?

पोलीस तक्रारीनुसार पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या मॅक्सिस बुलियन आणि पल्लव गोल्डच्या लादुलाल, पल्लव आणि शुभम यांच्याशी झवेरी बाजारातील व्यापाऱ्याशी ओळख झाली. त्यांनी आपल्याकडे व्यवसायासाठी चांगली योजना असून इथं दणदणीत परतावा मिळणार असल्याचं आश्वासन दिलं. या तिघांच्याही बोलण्यावर व्यापाऱ्यासह त्यांच्या नातलगांनीसुद्धा विश्वास ठेवत दोन कोटींच्या गुंतवणुकीनं सुरुवात केली. सुरुवातीला या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला आणि खरंच या योजनेत फायदा असल्याचं गुंतवणूकदारांना भासवण्यात आलं.

हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रात जमीन मोजणी हायटेक होणार! अनेक प्रश्न सहज सुटणार; असा आहे सरकारचा मास्टर प्लॅन

पैशांच्या परताव्याचं आमिष दाखवल्यानं पुढं व्यापारी आणि त्याच्या नातेवाईकांनी

 किलो सोनं,  कोटींची रोकड व्यापाऱ्याला दिली खरी. मात्र त्यावर काहीच परतावा मिळू शकला नाही. इथं गोष्टींचा गुंता वाढला. गुंतवणुकदारांना तिघांनी बँकेचे धनादेश (चेक) दिले, मात्र एकही धनादेश वटला नाही आणि 44 कोटींची रक्कम डब्बा ट्रेडिंगमध्ये बुडाल्याची माहिती समोर येताच गुंतवणुकदारांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यानंतर लादुलाल, पल्लव आणि शुभम या तिघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

FAQ

मुंबईतील शेअर बाजारात कोणता घोटाळा उघडकीस आला आहे?
मुंबईच्या झवेरी बाजारात सोन्याच्या व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली 'डब्बा ट्रेडिंग'द्वारे 44 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये 10 कोटींची रोकड आणि 36 किलो सोन्याचा समावेश आहे.

डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय?
डब्बा ट्रेडिंग हा शेअर बाजाराबाहेरील बेकायदेशीर ट्रेडिंगचा प्रकार आहे, ज्यामध्ये कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय आणि नियामक संस्थेच्या नियंत्रणाशिवाय व्यवहार केले जातात. यात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाते.

गुंतवणूकदारांचे नुकसान कसे झाले?
गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 44 कोटी रुपये (10 कोटी रोकड आणि 36 किलो सोने) गुंतवण्यास प्रवृत्त केले गेले आणि यात त्यांचं नुकसान झालं

Read More