Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

भाजपाचे 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात?

भाजपाचे 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यासोबत जे अपक्ष सरकार येईल

भाजपाचे 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात?

मुंबई : भाजपाचे 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यासोबत जे अपक्ष सरकार येईल म्हणून भाजपच्या संपर्कात होते, ते देखील आता राष्ट्रवादीसोबत आल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे, तसेच आदित्य ठाकरे यांच्यात वांद्रे येथील हॉटेल ताजलॅण्डमध्ये चर्चा सुरू आहे. 

तसेच या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सरकारस्थापनेची मागणी करणारं अधिकृत पत्र दिलं आहे. हा पाठिंबा दिल्यात जमा असल्याचंही सांगण्यात येत आहे.

आमदारकी गेली तरी चालेल पण...

या चर्चेत अजित पवार तसेच सुनील तटकरे, दिलीप वळसेपाटील हे देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांशी मागील काही दिवसापासून भाजपाचे आमदारसंपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. आमदारकी गेली तरी चालेल, आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊ, असं अजित पवारांना या आमदारांनी सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read More