Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईतल्या पॉश सोसायटीतील लिफ्टमध्ये 3 वर्षांच्या मुलाला मारहाण, व्हिडीओ पाहून लोकांचा संताप

सात वर्षांच्या मुलाने तीन वर्षाच्या मुलाला लिफ्टमध्ये मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारात सात वर्षांच्या मुलाची आई मदत करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार मुंबईतील हाय राईस इमारतीच्या लिफ्टमध्ये घडला आहे. 

मुंबईतल्या पॉश सोसायटीतील लिफ्टमध्ये 3 वर्षांच्या मुलाला मारहाण, व्हिडीओ पाहून लोकांचा संताप

मुंबईतील एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका सात वर्षांचा मुलगा आणि त्याची आई लिफ्टमधून जात होती. यावेळी या दोघांनी मिळून तीन वर्षांच्या मुलाला जबर मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या क्लिपमध्ये मुलगा आणि त्याची आई 3 वर्षांच्या चिमुरड्याला वारंवार मारहाण करत असताना दिसत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलाची केअरटेकर मुलाला वाचवत असल्याचेही दिसून आले आहे. तिच्या हातात या अल्पवयीन मुलाचं आणखी एक भावंड असल्याचं दिसत आहे. हा सगळा प्रकार इतका भयानक आहे की, मुलांना असं एकट्याने लिफ्टमधून पाठवणं किती सोईचं असल्याचं दिसत आहे. 

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील कनाकिया पॅरिस येथे लिफ्टमध्ये सात वर्षांचा मुलगा अल्पवयीन मुलाला अनेक वेळा मारत असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. मुलाची आई देखील तिच्या मुलाच्या हाताने तीन वर्षांच्या मुलाला मारताना दिसली. ही घटना तीन वर्षांच्या बाळाच्या केअरटेकर समोर घडली आहे. तीन वर्षांच्या मुलाला सांभाळणारी व्यक्ती त्याचवेळी  पीडित मुलाच्या 22 महिन्यांच्या भावाला धरून तीन वर्षांच्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण तिला न जुमानता हा सात वर्षांचा मुलगा आणि त्याची आई मारहाण करताना दिसत आहे. 

तीन वर्षांच्या मुलीचे वडील श्रीनिवासन रामचंद्रन यांनी प्रियंका गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेविरुद्ध आणि तिच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याच्या कलम ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, जो स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल शिक्षेशी संबंधित आहे.

तपासात असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नंतर सांगितले की, आरोपीला योग्य वर्तन करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. लागू केलेल्या कलमांनुसार अटक होत नाही कारण हा एक अदखलपात्र गुन्हा आहे.

Read More