Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राज्यात कोरोनामुळं ७ वा मृत्यू, केईएममध्ये महिलेचा मृत्यू

 मुंबईच्या केईएम रूग्णालयात ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झालायं 

राज्यात कोरोनामुळं ७ वा मृत्यू, केईएममध्ये महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या केईएम रूग्णालयात ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झालायं काल सायंकाळी या महिलेचा मृत्यू झाला असून तिच्यावर केईएम रूग्णालयातील ईएमएस या २० नंबरच्या वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९३ वर गेली आहे. 

तिला कोरोनाची लक्षणे दिसत होती तर मग तिला आयसोलेट करून उपचार करायला हवे होते. परंतु केईएम प्रशासनाने याकडं दुर्लक्ष केल्याने आता केईएम रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झालंय. तसंच या रूग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर,नर्स, कर्मचारी यांच्यात भितीचे वातावरण आहे. तसंच या कोरोना बाधित महिला रूग्णाच्या वॉर्डमध्ये इतर रूग्णही होते. जे इतर आजारामुळं गंभीर आहेत. त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. 

ज्या वॉर्डमध्ये ती महिला होती तो वॉर्ड अद्यापही मोकळा केलेला नाही. त्यामुळे केईएम प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा यामध्ये दिसून येतोय.

Read More