मुंबईत राहूनही आम्ही मराठी बोलणार नाही अशी भूमिका अनेक परप्रांतीय घेताना दिसत असून, त्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईत मागील काही दिवसांत अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आमच्याच भाषेत बोलणार अशी मुजोरी दाखवणाऱ्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी धडादेखील शिकवला आहे. पण अद्यापही अशा अनेक घटना समोर येताना दिसत आहेत. भांडुपमध्येही असा प्रकार समोर आला आहे. एका मराठी जोडप्याचा पिझ्झा डिलिव्हरी एजंटशी मराठी बोलण्यावरुन वाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, या मराठी जोडप्याने पिझ्झाची ऑर्डर दिली होती. दरम्यान डिलिव्हरी एजंटला मराठी येत नसल्याने त्यांचा त्याच्याशी वाद झाला. महिला त्याला मराठी येत नसेल तर हरियाणात जा असं सुरुवातीला सांगते. त्यावर तो मराठी येत नसेल तर जबरदस्ती बोलायचं का? अशी विचारणाही करतो. यादरम्यान त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होताना दिसत आहे.
" मराठी बोलो तब ही पैसा देंगे"
— Nedrick News (@nedricknews) May 13, 2025
- Mumbai में में #DominosPizza के डिलीवरी बॉय को कस्टमर ने कहा
- कस्टमर ने कहा कि पैसे चाहिए तो मराठी बोलनी पड़ेगी...#Mumbai #DominosPizza #DeliveryBoy #LatestNews #Nedricknews pic.twitter.com/vvDEvfduh0
मुंबईतील भांडुपमध्ये सोमवारी हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एंजटचं नाव रोहित असं आहे.
महिला - मराठी येत नसेल तर हरियाणात जाऊन राहायचं
एजंट - इथे मराठी बोलायची जबरदस्ती आहे का?
महिला - इथे असंच आहे
एजंट - असं कोण म्हणालं?
महिला - आम्हाला हिंदी येत नाही
एजंट - हिंदी येत नसेल तर मग ऑर्डर कशाला करायची?
यादरम्यान पैसे देत नाही असं सांगत तिचा पती दरवाजा बंद करायचा प्रयत्न करतो. पण महिला त्याला रोखते.
एजंट - पैसे द्यायचे नाहीत ना, ठीक आहे
महिला - अजून बोला
महिलेचा पती - धंदा चुकीचा करायचा आणि वर...
एजंट - ऑर्डर खराब असेलतर दाखवा
महिलेचा पती - ऑर्डर नीट पाठवा सांगायला मला फोन करायला लागला ना
एजंट -मीच तुम्हाला पत्ता विचारायला फोन केला होता
तुम्ही हवं त्याला फोन करा, येत नसेल तर काय जबरदस्ती मराठीत बोलायचं का?
महिला - माझा व्हिडीओ नाही काढायचा, मी तुझा व्हिडीओ काढू शकते
एजंट - ही कोणती जबरदस्ती आहे