Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई - अंगावर शिंकला म्हणून मित्राला सॅनिटायझर टाकून पेटवलं, अंधेरीतील धक्कादायक घटना

16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळल्याची धक्कादाक घटना घडली आहे. अंधेरीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

मुंबई - अंगावर शिंकला म्हणून मित्राला सॅनिटायझर टाकून पेटवलं, अंधेरीतील धक्कादायक घटना

मुंबईत एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राचा चेहरा सॅनिटायझर टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरीत हा प्रकार घडला असून, पीडित मुलगा फक्त 16 वर्षांचा आहे. पीडित कॉलेज विद्यार्थी असून त्याचा चेहरा भाजला आहे. मुलाला सध्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

26 डिसेंबरला ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका क्षुल्लक कारणावरुन गोल डोंगरी परिसरात हा सगळा घडला. मोबाइलमध्ये व्हिडीओ पाहत असताना अंगावर शिंकला म्हणून मुलाने त्याच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकलं आणि नंतर काडी पेटवत त्याचा चेहरा जाळला. 

49 वर्षीय सईदा खान यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हुसैन घराबाहेर पडला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास तो घरी आला असता, त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जळालं होतं. चौकशी झाले असता, त्याने आपण जुबैनसह जवळच्या सोसायटीत गेला होता. तिथे ओळखीतील एक 16 वर्षीय मुलगा आला होता. तिथे व्हिडीओ पाहत असताना हुसैनला शिंक आली. ही शिंक अंगावर आल्याने तो मुलगा घरी गेला आणि परत आल्यानंतर हुसैनवर सॅनिटायझर टाकून पेटवलं.

यानंतर त्याच्या मित्रांना पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. पण आग लागल्याने मुलाचा चेहरा विद्रूप झाला आहे. याप्रकरणी त्याच्या आजीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत  मुलाला ताब्यात घेतलं होतं.  

मुलाला ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्याचं समुपदेशन करण्यात आलं आणि नंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

Read More