Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Shivsena : शिवसैनिकांसाठी मंदिर असलेल्या शिवसेना शाखेत दारूपार्टी; शाखाप्रमुख, उपविभागप्रुख सगळेच हातात दारुचे ग्लास घेऊन...

मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना शाखेमध्ये दारूपार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून विरोधकांकडून जोरदार टीका केलीय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. 

Shivsena : शिवसैनिकांसाठी मंदिर असलेल्या शिवसेना शाखेत दारूपार्टी; शाखाप्रमुख, उपविभागप्रुख सगळेच हातात दारुचे ग्लास घेऊन...

Chembur Shivsena Shakha :मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना शाखेमध्ये दारूपार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून सुनिल प्रभू यांनी टीका केली आहे. शिवसैनिकांसाठी शाखा हे मंदिर आहे. अशा मंदिरात हे दारू पार्टी करतात. यानिमित्ताने त्यांचा बुरखा फाटल्याची टीका त्यांनी केली. 

मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना शाखेमध्ये दारूपार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. गंभीर बाब म्हणजे दारूपार्टीच्या ठिकाणी मागे पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर यांचे फोटो आहेत.. त्यासमोरच दारुपार्टी रंगल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

या पार्टीत शाखाप्रमुख दिपक चौहान, उपविभागप्रुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारीही सहभागी असल्याचं दिसतंय. टेबलवर दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लासही पाहायला मिळत आहे.मात्र झी २४ तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केला आहे.

अशा प्रकारे जर घटना घडली असेल तर ती दुर्दैवी असल्याची प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलीय. दारुपार्टीच्या या व्हिडिओवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातात आयता मुद्दा मिळाला. त्यामुळे आगामी काळात यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगणार यात शंका नाही.

दरम्यान,  ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वीच शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तसंच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांच्या नेत्यांचा ठाणे दौरा वादळी ठरला.  आनंद दिघेंच्या पुतळ्याला नेत्यांनी अभिवादन केलं.  यावेळी शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले. आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाबाहेर शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. 

 

Read More