Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मेट्रो-३ ची आरे कारशेड रॉयल पाममध्ये, बिल्डरच्या फायद्यासाठी - भाजप

मेट्रो-३ ची आरेमधली कारशेड हलवण्याचा विचार सुरू आहे. रॉयल पाममध्ये कारशेड उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.  

मेट्रो-३ ची आरे कारशेड रॉयल पाममध्ये, बिल्डरच्या फायद्यासाठी - भाजप

मुंबई : मेट्रो-३ ची आरेमधली कारशेड हलवण्याचा विचार सुरू आहे. रॉयल पाममध्ये कारशेड उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. याला स्थानिकांनी विरोध केला आहे. तर बिल्डरच्या फायद्यासाठी कारशेड हलवली जात असल्याचा भाजपकडून आरोप करण्यात आला आहे. 

आरेतल्या कारशेडला विरोध होत असताना रॉयल पामने काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या वनशक्तीलाही पत्र लिहिल्याची माहिती आहे. कारशेड रॉयल पाममध्ये हलवायला स्थानिकांचा विरोध आहे. तर हे सगळे बिडल्डच्या फायद्यासाठी आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. मुंबईत मेट्रो कार शेड आता आरे कॉलनीजवळच्याच रॉयल पाममध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी हा घाट घातला जात असल्याचा भाजपकडून खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अजून तरी मुंबई मेट्रो कारशेडचा तिढा सुटण्याची चिन्हं दिसत नाही. त्यामुळे दिवसाला कित्येक कोटींचे नुकसान होत आहे. आणि मेट्रोची डेडलाईनही पुढे जात आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कार शेडचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते. यावरुन विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Read More