Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत गाडीला अपघात, एअरबॅग्समुळे वाचला जीव

मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास वरळीहून वांद्र्याच्या दिशेने जाणा-या टोयोटा करोला गाडीचा अतीवेगामुळे अपघात झाला.

मुंबईत गाडीला अपघात, एअरबॅग्समुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास वरळीहून वांद्र्याच्या दिशेने जाणा-या टोयोटा करोला गाडीचा अतीवेगामुळे अपघात झाला.

अती वेगामुळे चालकाचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि गाडी डिवायडरवर जाऊन धडकली. गाडीतून पाच जण प्रवास करत होते. त्यापैकी चार जण जखमी आहेत. एक मुलगी गंभीर जखमी असून जखमींवर भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

एअरबॅग्स वेळेवर उघडल्याने चालक या अफघातात बचावला. सुदैवाने यात सर्व प्रवासी बचावले आहेत.

पाहा व्हिडिओ

 

Read More