Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

वाढदिवसाचे बॅनर न लावता दुष्काळग्रस्त भागात काम करा, आदित्य ठाकरेंचं आवाहान

बॅनरबाजी न करता समाजपयोगी कार्यक्रम करण्याचा सल्ला

वाढदिवसाचे बॅनर न लावता दुष्काळग्रस्त भागात काम करा, आदित्य ठाकरेंचं आवाहान

मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे. माझ्या वाढदिवसाला बॅनरबाजी करु नका. बॅनरबाजी न करता समाजपयोगी कार्यक्रम करण्याचा सल्ला युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांचे सामाजिक भान पाहायला मिळाले.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर खात्यावरुन पोस्ट करुन हे आव्हान केले आहे. महाराष्ट्रात तसेचच देशभरात नेत्यांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आणि मोठ्या प्रमाणावर टीव्हीवर जाहिराती दिल्या जातात. त्यासाठी पैसे वाया न घालवता त्या पैशांचा उपयोग  पर्यावरण आणि दुष्काळासाठी करावा. दरवर्षाप्रमाणे  तुमचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासाठी महत्वाचे आहे असे आपल्या ट्विटच्या शेवटी म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, 'माझी नम्र विनंती आहे, कृपया माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलेही कायदेशीर/ बेकायदेशीर बॅनर लावू नये. त्यावर पैसे खर्च करण्याऐवजी, दुष्काळग्रस्त भागात सुरु असलेले आपले कार्य चालू ठेवा, पर्यावरणासाठी/ समाजासाठी काम करा. दरवर्षीप्रमाणे, मला आपले प्रेम आणि आशिर्वादच महत्वाचे आहेत.'

याआधी अशाच प्रकाराचे आव्हान नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील केले होते.  

राज्यासह आपल्या नगर जिल्ह्यातही दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे. अशा परिस्थितीत सत्कार सोहळयासाठी कोणताही खर्च न करता कार्यकर्त्यांनी तो पैसा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन निवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

राज्यासोबतच अहमदनगरमध्ये देखील दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या सत्कारावर खर्च नका. त्याऐवजी ते पैसे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचं आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले होतं.

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आपला बळीराजा मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. आपल्या प्राण्यांना कसे जगवायचे असा प्र्श्न त्यांना भेडसावतो आहे. फटाके आणि गुलालावर पैसै उधळण्याऐवजी त्या पैशांचा वापर बळीराजा आणि चाराछावण्यांसाठी करा, असा सल्ला नवनिर्वाचित खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केला. 

Read More