Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Taj हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर बिल समोर आल्यावर खिशातून Coins ची पिशवी काढली अन्...; पाहा Video

Taj Hotel Food Bill In Coin: हा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या व्हिडीओवरुन लोकांचे दोन वेगवेगळे गट पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Taj हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर बिल समोर आल्यावर खिशातून Coins ची पिशवी काढली अन्...; पाहा Video

Taj Hotel Food Bill In Coin: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल एक्सपिरमेंटच्या नावाखाली काहीजण भन्नाट प्रयोग करताना दिसतात. असाच एक प्रयोग एका मुंबईकराने केला आहे. या मुंबईकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. सिद्धेश लोकरे असं या मुंबईकर तरुणाचं नाव आहे. 

दोन गट पडले

सिद्धेशने मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर बिल भरण्याची वेळ आली तेव्हा सिद्धेशने असं काही केलं की आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहत राहिले. सिद्धेने बील भरण्यासाठी चक्क चिल्लरचा वापर केला. सिद्धेशने खाण्याचं संपूर्ण बिल चिल्लर वापरुन म्हणजेच नाणी वापरुन भरलं आहे. खरं तर हा फार विचित्र एक्सपिरिमेंट होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. काहींनी हे योग्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी हे असं करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 

व्हिडीओत नेमकं काय?

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धेश ताज हॉटेलबाहेर उभा असल्याचं दिसत आहे. हॉटेलमध्ये जण्यासाठी तो जॅकेट परिधान करतो आणि या जॅकेटमधील चिल्लरसहीत हॉटेलमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये गेल्यानंतर तो फूड ऑर्डर करतो. पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर केल्यानंतर सिद्धेश बिल मागवतो. हॉटेलमधील कर्मचारी त्याला बिल आणून देतात. त्यानंतर सिद्धेश नाण्यांच्या माध्यमातून पूर्ण रक्कम भरताना दिसतो. "ताज हॉटेलमध्ये कांड करुन आलो यार, ट्रॅन्झॅक्शन मॅटर करता है. मग ते डॉलरमध्ये केलेलं असो किंवा चिल्लरचं असो" अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

काय संदेश द्यायचा आहे?

या व्हिडीओमधून सिद्देशला तुम्ही आहात त्याच परिस्थितीमध्ये राहा असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या व्हिडीओवरुन दोन गट पडले आहेत. यापैकी एक गट हे योग्य असल्याचं सांगत चांगला संदेश दिल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे नाण्यांमधून पैसे देऊन येथील कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्षपणे नाणी मोजण्याचा छळच असल्याचा टोला लगावला आहे.

Read More