Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एअर इंडियाची इमारत विक्रीला, पण सरकारचं घेणार विकत

एकेकाळी मुंबईची ओळख असणार इमारत विक्रीला

एअर इंडियाची इमारत विक्रीला, पण सरकारचं घेणार विकत

मुंबई : एकेकाळी मुंबईची ओखळ बनलेल्या एअर इंडियाची इमारत आता विक्रीला काढण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पण विक्री होणार असली, तरी इमारत सरकारच्याच ताब्यात राहील याची खबरदारी घेण्यात आली आहे. २३ मजली इमारत आता जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जेएनपीटी ही सरकारी कंपनी विकत घेणार आहे. डबघाईला आलेल्या एअर इंडियाच्या मालकीची ही २३ मजली इमारत कवडी मोलानं विकत घेण्याचे मनसुबे काही खासगी कंपन्या आखत होत्या. पण केंद्रानं आपल्याच नफ्यातल्या कंपनीचे पैसे वापरून आता बाजार भावनं ही इमारत जेएनपीटीला  विकण्याचा निर्णय घेऊन हे मनसुबे उधळून लावलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची होकार दिल्यावर व्यवहाराचे तपशील ठरणार आहेत.

Read More