Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

६ दिवस सरकार झोपले होते का? - अजित पवार

आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.

६ दिवस सरकार झोपले होते का? - अजित पवार

मुंबई : आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.

शेतक-यांच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन सरकारने दिले आहेत. मात्र, यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

काय म्हणाले अजित पवार?

शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेमलेली मंत्री समिती ही एक सरकारची चाल आहे. कुठलाही मुद्दा गळ्यापर्यंत आला की सरकार समिती नमते, अभ्यास करणार म्हणते. ३.५ वर्षे झाली आता अभ्यास काय करताय? मोर्चामधील मुद्दे काही नवीन नाहीत जुनेच आहेत. 

सहा दिवस झोपले होते का?

मोर्चा निघाला तेव्हापासून ६ दिवस सरकार झोपले होते का, मोर्चा प्रतिसाद मोठा असल्याचे लक्षात येताच काल रात्री खडबडून जागे झाले, समिती नेमली. इतके दिवस झोपा काढल्या का??

Read More