Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अजित पवार एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला उपस्थित राहतील का?

अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून होम क्वारंटाईन आहेत

 अजित पवार एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला उपस्थित राहतील का?

मुंबई : अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून होम क्वारंटाईन आहेत. थकवा जाणवत असल्यानं अजित पवार क्वारंटाईन असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांनी कालपासून आपल्या सर्व बैठका रद्द केल्यायत. आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात होणारा जनता दरबारही रद्द करण्यात आलाय. दुपारी २ वाजता राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत मात्र अजित पवार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत. 

आता एकनाथ खडसे जे भाजपासोडून राष्ट्रवादीत येणार आहेत, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. खडसेंच्या या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहतील का? याविषयी उत्सुकता लागून आहे. 

अजित पवार यांची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते उद्या एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहतील किंवा राहणार नाहीत यांचा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. 

अजित पवार हे कोरोना काळात सर्वात जास्त काळजी घेणारे मंत्री आहेत. अजित पवार पत्रकारांसमोर येतात तेव्हा देखील त्यांचा पहिला सल्ला असतो, अंतर ठेवा. दूर उभे राहा.

Read More