Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

वीज निर्मितीचा जबराट देशी जुगाड; आनंद महिंद्रांनी ट्विट केला व्हिडिओ

उद्योजक आनंद महिंद्रा सोशलमीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात.  त्यांच्या मजेशीर ट्विट्सच्या चर्चाही होत असतात.

वीज निर्मितीचा जबराट देशी जुगाड; आनंद महिंद्रांनी ट्विट केला व्हिडिओ

मुंबई: उद्योजक आनंद महिंद्रा सोशलमीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात.  त्यांच्या मजेशीर ट्विट्सच्या चर्चाही होत असतात. आनंद यांनी केलेले ट्विट कमी वेळात सोशलमीडियावर व्हायरल होतात. 

नुकतेच त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.  ज्यात वीज निर्मितीचा देसी जुगाड होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.  त्यांचे हे ट्विट कमालीचे व्हायरल होत आहे.

आनंद यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये बकरीची लहान पिल्लं दूध पिताना दिसत आहेत.  दूध पितांना ही पिल्लं शेपटी हलवत आहेत. तर त्यावर आनंद यांनी म्हटले आहे की, 'लोकं याला फक्त प्रेमळ प्राणी म्हणून पाहत असतील, परंतु मला वाटतं की जगाने ऊर्जेचा नवीन स्त्रोत शोधला आहे. #Trailpower या हलणाऱ्या शेपट्यांना टरबाईन आणि प्रेस्टो जोडले तर वीजेची निर्मिती होऊ शकते.'

आनंद यांच्या या व्हिडिओला सोशलमीडियावर चांगलचीच पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ 66 हजाराहून अधिकवेळा शेअर केला गेला आहे. 1 मिनिट 15 सेकंदांच्या या व्हिडिओवर युजर्स व्यक्त होत आहेत.

Read More