Anant Ambani-Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला एक वर्ष झालं. आता जर त्यांच्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर हे लग्न एक सामाजिक कार्यक्रम किंवा त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न नव्हता. हा एकमेव क्षण होता ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची चर्चा झाली. जे आजवर कोणत्याही व्यवासायाचा करार किंवा चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये कधीही झालं नव्हतं.
अनेक दशकांपासून, भारत हा एक असा देश होता ज्याकडे जगाने दुर्लक्ष केलं होतं किंवा तो एक वेगळाच भाग आहे असं म्हणून पाहिलं. आपला देश हा परंपरा, आर्थिक क्षमता आणि प्राचीन ज्ञानासाठी ओळखला जातो. परंतु या लग्नानं जागतिक शक्ती केंद्रांना जणू थांबवलं आणि त्यांनी आपल्याकडे निरखून पाहिलं. त्याशिवाय त्यांच्या हे देखील लक्षात आलं की भारत हा त्याच्या सांस्कृतिक परंपरेंसोबत डिप्लोमेटीक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि जागतिक चर्चांचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे.
भारताच्या इतिहासात झालेल्या कार्यक्रमांकडे पाहायचे झाले तर, या लग्नानं आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांचं जितकं लक्ष वेधले तसं कधीच झालं नव्हतं. पाहुण्यांची यादी केवळ सगळ्यांना आश्चर्य होईल इतकी नव्हती तर राजकीयदृष्ट्या देखील ती खूप महत्त्वाची होती.
टोनी ब्लेअर, बोरिस जॉन्सन आणि मॅटेओ रेन्झी सारख्या माजी पंतप्रधानांपासून ते अरामको, एचएसबीसी, अॅडोब, सॅमसंग आणि टेमासेकच्या प्रमुखांपर्यंत जागतिक नेते केवळ लग्नाला उपस्थित नव्हते. या लग्नातून हे देखील दिसून आलं की भारत हा जगाला एकाच छताखाली एकत्र आणण्याची क्षमता ठेवतो.
त्या क्षणी, भारत फक्त एक डेस्टिनेशन नव्हतं तर ते जागतिक व्यासपीठ ठरलं. आजच्या जगात, प्रभाव केवळ अर्थशास्त्र किंवा संरक्षणावर आधारित नाही. ते सॉफ्ट पॉवरनं मोजले जाते. सांस्कृतिक ट्रेंड सेट करण्याची आणि जगाला तुमच्या प्रतिमेत साजरे करण्याची क्षमता दिसून आली.
हे लग्न भारताकडे असलेली सॉफ्ट पावर दाखवण्याचा जणू एक क्षण होता. लग्नातील विधी, भारतीय पोशाख, परंपरेबद्दल आदर, पाहुण्यांचं आदरातिथ्य स्वागत हे सगळं बरेच दिवस जागतिक स्तरावर ट्रेंड करत होतं. टाइम्स स्क्वेअरपासून रियाधपर्यंत, लंडनपासून सोलपर्यंत भारत त्याच्या आयटी पार्क किंवा जीडीपीच्या आकडेवारीसाठी चर्चेत येत नव्हता. आता त्याची संस्कृती, भव्यता आणि स्वतःच्या सांस्कृतिक अटींवर जागतिक लक्ष वेधण्याच्या क्षमतेसाठी सगळीकडून त्याचं कौतूक करण्यात येत होतं.
हे लग्न भारताचं पहिलं खऱ्या अर्थाने जागतिक जीवनशैली आणि सांस्कृतिक गोष्टींना परदेशापर्यंत घेऊन जाण्याचा कार्यक्रम ठरला.
वर्षानुवर्षे, भारतानं रूढीवादी कल्पनांचे भार उचलले. गरिबी, वाद किंवा आउटसोर्सिंगचं ठिकाणं असं म्हटलं जात होतं. या लग्नानं त्या सगळ्या विचारांना एका रात्रीत बदलंल.
अचानक, भारत असं ठिकाण झालं जिथे सीईओ, अध्यक्ष आणि जागतिक सेलिब्रिटी उपस्थित होते. परंपरा आणि आधुनिक सुसंस्कृततेचा देश हे पुन्हा एकदा जगासमोर आलं. नवीन सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवस्थेचं नेतृत्व करण्यास सक्षम राष्ट्र अशी पुन्हा एकदा ओळख समोर आली. हे राज्य-प्रायोजित उपक्रम किंवा सरकारी शिखर परिषद नव्हती, तर हा एक खासगी कार्यक्रम अर्थात भारतीय कुटुंब होतं ज्यानं एका लग्नसमारंभातून ते साध्य केले जे केवळ राजकारण आणि उद्योगांना शक्य नव्हते ते म्हणजे भारताकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणं.
अंबानींचं लग्न केवळ प्रेमाचा उत्सव नव्हता. तर सॉफ्ट पॉवर पोझिशनिंगमध्ये हा एक उत्कृष्ट कार्यक्रम होता. शांतपणे भारत जगासमोर येत नव्हता तर आत्मविश्वास आणि करिष्मासह संस्कृती जपण्यात सगळ्यात पुढे आणि राजनैतिक महासत्ता म्हणून स्वतःची घोषणा करणारा भारत होता.
अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या एका वर्षानंतर हे स्पष्ट झाले आहे की हे लग्न फक्त एकच क्षण नव्हता. तर तो क्षण होता जेव्हा भारतानं जागतिक व्यासपीठावर आपले स्थान निर्णायकपणे मिळवले.