Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अभिनेत्री नेहा धुपिया संदर्भातील 'ती' बातमी खरी

अभिनेत्री नेहा धुपिया हिच्याबाबत जी बातमी सोशल मीडियाव रंगत होती तसेच चर्चा होत होती, ती बातमी खरी ठरली आहे. 

अभिनेत्री नेहा धुपिया संदर्भातील 'ती' बातमी खरी

मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया हिच्याबाबत जी बातमी सोशल मीडियाव रंगत होती तसेच चर्चा होत होती, ती बातमी खरी ठरली आहे. अभिनेता अंदग बेदी आणि नेहा धुपियाने गुपचुप लग्न केले होते. नेहा आणि अंगदने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ बांधल्याचं वृत्त समोर आले. सोशल मीडियावर या लग्नाविषयी बरीच मतमतांतरं झाल्याचंही पाहायला मिळालं. किंबहुना नेहा गरोदर असल्यामुळेच तिने आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अंगदशी इतक्या घाईने लग्न केल्याचंही म्हटलं गेले होते. आता या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या असून नेहा लवकरच आई होणार आहे. 

खुद्द नेहाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ‘एक नवीन सुरुवात..’अशी फोटोओळ दिलेय. नेहाने अंगदसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नेहाचा बेबी बंप पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंगदनेही नेहाच्या गरोदरपणाविषयी होत असणाऱ्या चर्चा या पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याने ट्विट करुन ही अफवा खरी असल्याचे म्हटलेय.

Read More