Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे.

रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

मुंबई : साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे. देशातील एकूण ४२ साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले जाणार आहे. याबाबत साहित्य अकादमीने ट्विट केलेय. २०१८ या वर्षासाठी जी साहित्य अकादमी पुरस्काराची यादी ट्विटरवर जाहीर केली आहे. यात रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार तर  युवा साहित्य अकादमी पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या 'फेसाटी' या कादंबरीला जाहीर झाला आहे.

बाल साहित्य पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून मराठी विभागासाठी डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर वसंत पाटणकर आणि बाबा भांड या तिघांनी काम पाहिले तर साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी रा. र. बोराडे, वसंत अबाजी डहाके आणि सतीश आळेकर यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. रत्नाकर मतकरी यांनी बाल साहित्यात लिहिलेल्या कथा आणि गोष्टी प्रचंड गाजल्या. बालमनावर एक वेगळाच संस्कार करणाऱ्या या कथा होत्या. 'अलबत्या गलबत्या' हे नाटक आणि त्यातली चेटकिण आणि मधुमंजिरी ही पात्रे अजूनही बालगोपाळांच्या लक्षात आहेत. सध्या हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे.

Read More