Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अशोक सावंत हत्या : आरोपींच्या शोधासाठी पथकं मुंबईबाहेर रवाना

शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं शहराबाहेर रवाना केली आहेत. पोलिसांना आरोपींची माहिती असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

अशोक सावंत हत्या : आरोपींच्या शोधासाठी पथकं  मुंबईबाहेर रवाना

मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं शहराबाहेर रवाना केली आहेत. पोलिसांना आरोपींची माहिती असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

हत्येचा हेतू स्पष्ट नाही

दरम्यान, अजून हत्येचा हेतू स्पष्ट झालेला नाही. तीन वर्षांपूर्वी एका व्यक्तीने अशोक सावंत यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. पोलीस त्या तक्रारदाराचाही शोध घेत आहेत. काल तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यातल्या दोघांना अटक करण्यात आलीय. 

कांदिवलीत तणावाचं वातावरण

 कांदिवली समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी चॉपरनं वार करुन निघृण हत्या केली. त्यांच्या घराजवळच अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.  अशोक सावंत रात्री घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांना उपचारासाठी तातडीनं श्री साई या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं मात्र तिथं त्यांना मृत घोषीत करण्यात आलं. या हत्येमुळे कांदिवली परिसरात तणावाचं वातावरण आहे.

Read More