Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राष्ट्रवादीने स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय बदलला

 काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करणार

राष्ट्रवादीने स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय बदलला

मुंबई : राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादीतर्फे देऊन जाहीरनामा प्रकाशित झाला नाही. आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय झाल्याने राष्ट्रवादीने स्वतःचा वेगळा जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी बदलला आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या बैठकीत आघाडीची एकच जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा वेगळा जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय रद्द झाला आहे.

लवकर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. आघाडीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. 

एकच जाहीरनामा असावा असा आघाडीचा आग्रह आहे. त्यामुळे आम्ही जाहीरनामा प्रकाशित करण्याचा कार्यक्रम रद्द केल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

Read More