Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

बकरी ईदची बुधवारची सुट्टी रद्द केल्याचा मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम

Bakri Eid 2023 Holiday: बकरी ईदनिमित्त बुधवारी जाहीर करण्यात आलेली सुट्टी शासनाकडून मागे घेण्यात आली.

बकरी ईदची बुधवारची सुट्टी रद्द केल्याचा मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम

Bakri Eid 2023 Holiday Cancelled on 28 June: बकरी ईदनिमित्त बुधवारी जाहीर करण्यात आलेली सुट्टी शासनाकडून मागे घेण्यात आली. तसेच गुरुवारी 29 जून रोजी ही सुट्टी देण्यात आली. सर्व शासकीय विभागांना याबद्दलची माहिती कळविण्यात आली. याचा परिणाम मुंबई विद्यापिठाकडून सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. सर्व महाविद्यालयांना यासंदर्भात सुचना देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, 28 जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बकरी ईदचा सण गुरुवार, 29 जून रोजी येत असल्याने 28 जूनला देण्यात आलेली सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे.

fallbacks

ही प्रवेश प्रक्रिया 12 जूनच्या परिपत्रकानुसार घेण्यात येणार आहे. तसेच प्रवेशाची दुसरी यादी 28 जून रोजी जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

बकरी ईद हा सण गुरुवार दिनांक 29 जून 2023 रोजी येत असल्याने या दिवशीच्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेच्या एकूण 25 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

तसेच मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियाची दुसरी यादी यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिनांक 29 जून 2023 रोजी जाहीर केली जाणार होती. परंतु या दिवशी सुट्टी जाहीर झाल्याने प्रवेशाची दुसरी यादी दिनांक 28 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर होईल.

दिनांक 29 जून रोजी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या एकूण 25 परीक्षा होत्या. त्यातील अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्ष सत्र दोनच्या सर्व शाखेच्या ( चॉईस बेस व सी स्कीम ) या परीक्षा 30 जून 2023 रोजी ठेवण्यात आलेल्या आहेत. 

तसेच बीएससी ( हॉस्पिटॅलिटी स्टडीज )  सीबीएसजीएस व चॉईस बेस सत्र 5,  टीवाय बीएससी (फॉरेन्सिक सायन्स) सत्र 6,  एमएससी व एमएससी ( बाय रिसर्च ) चॉईस बेस सत्र 4,
बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स) चॉईस बेस सत्र 6,  बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट ) सत्र 6,  बीकॉम ( फिनान्शियल मॅनेजमेंट ) सत्र 6,  टिवाय बीकॉम (आयडॉल ) सत्र 6,  बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट ) सत्र 6,  बीएमएस सत्र 5,  एमए सीबीएसजीएस सत्र 2 आणि 4,  बीएड सत्र 4, आणि  एमएड सत्र 4 अशा सकाळच्या सत्रातील 17 परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या असून यांची सुधारित तारीख 8 जुलै 2023 ही आहे. 

तसेच दुपारच्या सत्रातील टीवाय बीएससी (फॉरेन्सिक सायन्स ) सत्र 5 , एमएमएस (आयडॉल ) सत्र 3,  टीवाय बीए (आयडॉल ) सत्र 6,  एमए (कम्युनिकेशन अँड  जर्नालिझम ) सत्र 3, एमए ( पब्लिक रिलेशनस)  सत्र 3,  एमए (टेलिव्हिजन स्टडीज )  सत्र 3,  एमए (इलेक्ट्रॉनिक मीडिया ) सत्र 3 आणि एमए (फिल्म स्टडीज ) सत्र 3 अशा आठ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत या परीक्षांची सुधारित तारीख 8 जुलै 2023 रोजी ठेवण्यात आली आहे.

प्रवेशाची दुसरी यादी 28 जून रोजी जाहीर होणार

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिनांक 29 जून रोजी जाहीर होणार होती, परंतु बकरी ईदची सुट्टी 29 जून रोजी जाहीर झाल्याने, प्रवेशाची दुसरी यादी 28  जून रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर होईल.

28 रोजी कार्यालय सुरू आणि 29 रोजी सुट्टी

यापूर्वीच्या शासकीय सुट्टीनुसार बकरी ईदची सुट्टी ही 28 जून रोजी होती परंतु ती सुट्टी 29 जून रोजी असल्याने मुंबई विद्यापीठाचे सर्व कार्यालये बुधवार दिनांक 28 जून रोजी सुरू असतील तर दिनांक 29 जून रोजी मुंबई विद्यापीठाचे सर्व कार्यालये हे बंद असतील याची विद्यार्थी आणि महाविद्यालये यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठाने केले आहे

Read More