Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई पोलिसांकडून 5 महिलांसह 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक

मुंबई पोलिसांनी पाच महिलांसह 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. 

मुंबई पोलिसांकडून 5 महिलांसह 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक

Mumbai News: मुंबईतील शिवाजी नगर आणि आरसीएफ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मुंबईतील गोवंडी आणि चेंबूर या भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. गोवंडी आणि चेंबूरमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुंबई पोलिसांना मिळाल्या असून, त्याअंतर्गत आता त्यांच्यावर विशेष कारवाई करण्यात आली आहे.

अवैध बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. प्रत्येक टीमला एका विशिष्ट क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. जिथे त्यांनी सखोल तपास केला आणि बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई

मुंबई पोलीस आता बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर अधिक कडक नजर ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पूर्णपणे कडक कारवाई व्हावी, यासाठी यापुढील काळातही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या सर्व बांगलादेशी नागरिकांविरुद्ध परदेशी कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, त्यांना कोणत्या टोळीने आश्रय दिला होता, याचाही तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

यापूर्वी 13 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. जे गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होते. मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले असून ते मजुरीचे काम करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

यामध्ये पाच महिलांचाही समावेश 

मुंबई पोलिसांनी पाच महिलांसह १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. गोवंडी शिवाजी नगर आणि आरसीएफ पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशीयांमध्ये 8 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. ते बांगलादेशी तृतीयपंथी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिवाजी नगर गोवंडी येथे राहत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Read More