Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

भाजप दंगली घडवणार? राऊत यांनी केला हा मोठा आरोप

देशातील कष्टकरी जनतेशी, शेतकऱ्यांशी भाजप सरकारचे काहीच देणेघेणे नाही.

भाजप दंगली घडवणार? राऊत यांनी केला हा मोठा आरोप

मुंबई : सगळं काही ठीक चाललंय पण ते यांना पाहवत नाही. काही करून त्यांना सत्ता हवीय. देश गिळंकृत करायचा आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय.

देशातील परदेशी गुंतवणुकीवर परिणाम होतोय. देशात गुंतवणूक करायला परदेशी कंपन्या तयार नाहीत. असे अनेक प्रश्न या सरकारमुळे निर्माण झाले आहेत. 

देशातील कष्टकरी जनतेशी, शेतकऱ्यांशी भाजप सरकारचे काहीच देणेघेणे नाही. अनेक प्रश्न तयार झालेत पण त्याकडे लक्ष नाही. देशांत जेथे दंगे झाले त्याला भाजप जबाबदार आहे. केंद्रातील सरकारनेच या दंगली घडविल्या आहेत.

दिल्लीसह देशात ठिकठिकाणी महानगरपालिका निवडणूक होणार आहेत. त्या मनपा निवडणुकांपूर्वी दंगली घडविण्याचा कट भाजपने आखला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. 

Read More