Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; रुग्णालयाबाहेरील Video समोर

Shefali Jariwala Death: शुक्रवारी रात्री उशीरा या अभिनेत्रीला तिचा पती आणि काही सहकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आले असता तिला मृत घोषित करण्यात आलं.

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; रुग्णालयाबाहेरील Video समोर

Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झालं. 'काँटा लगा' गाण्यामुळे दोन दशकांपूर्वी घराघरात परिचयाचा झालेला हा चेहरा बिग बॉसच्या 13 व्या पर्वात झळकला होता. शेफालीने वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अंधेरीमधील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शेफालीला रात्री उशीरा दाखल करण्यात आलं. मात्र तिला मृत घोषित केलं गेलं. शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे. शेफालीचं निधन झाल्याचं वृत्त सर्वात आधी पत्रकार विकी लालवानीने सोशल मीडियावर दिलं. 

शेफालीच्या मृत्यूनंतर पती रुग्णालयाबाहेर पडताना व्हिडीओ

शेफालीला घेऊन तिचा पती अभिनेता पराग त्यागी आणि इतर तीन जण रात्री उशीरा बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आले. शेफालीला मृत घोषित करण्यात आल्यानंतर तिचं पार्थिव पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आलं. शेफालीच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिचा पती रुग्णालयाबाहेर पडतानाचा व्हिडीओ 'इस्टंट बॉलीवूड'ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेला पराग त्यागी उदास दिसत असून डोक्याला हात लावून बसल्याचं व्हिडीओत पाहायला मिळलं.

चाहत्यांना मोठा धक्का

शेफालीला परागने काही जवळच्या व्यक्तींच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करुन घेण्याआधीच मृत घोषित केलं. शेफालीच्या मृत्यूची बातमी रात्री उशीरा समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन तिचा श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बिग बॉसमध्ये शेफालीसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राजीव अडातिया, अली गोनी आणि मिका सिंग यांनाही शेफालीला श्रद्धांजली अर्पण केली.

शेफालीने अनेक कार्यक्रमांमध्ये नोंदवलेला सहभाग

शेफालीला सर्वात आधी 'काँटा लगा' गाण्यातून लोकप्रियता मिळाली. 2008 साली शेफाली बुगी-वुगी कार्यक्रमातही सहभागी झालेली. तिने 2025 अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग आणि शेफाली हे दोघे 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या पाचव्या आणि सातव्या पर्वात दोघेही सहभागी झालेला. त्याचप्रमाणे मध्यंतरी शेफाली अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस 13'मध्येही सहभागी झाली होती.

शेफालीने सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्राचा प्रमुख भूमिका असलेल्या 'मुझसे शादी करोगी' चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. 2018 मध्ये शेफाली अल्ट बालाजीची वेब सिरीज 'बेबी कम ना'मध्ये झळकली होती. तिने या वेब सिरीजमध्ये श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर करताना मुख्य भूमिका बजावली होती. 

Read More