Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एक फ्लॅट 226 कोटींना विकला; मुंबईत झाली भारतातील सर्वात मोठी प्रॉपर्टी डील

मुंबईत भारतातील सर्वात मोठी प्रॉपर्टी डील झाली आहे. एक फ्लॅट 226 कोटींना विकला गेला आहे. 11,485 चौरस फूटचा हा फ्लॅट आहे. 

एक फ्लॅट 226 कोटींना विकला; मुंबईत झाली भारतातील सर्वात मोठी प्रॉपर्टी डील

Biggest Property Deal In Mumbai South Mumbai : 11,485 चौरस फूटचा एक फ्लॅट 226 कोटींना विकला गेला आहे. भारतातील सर्वात मोठी प्रॉपर्टी डील मुंबईत झाली आहे. ज्या इमारतीत हा फ्लॅट आहे तिचे बांधकाम अजून सुरु आहे. प्री बुकिंगमध्ये  226 कोटीं हा फ्लॅट विकत घेण्यात आला आहे. मुंबईत नेमकी कुठे झाली आहे फ्लॅटची विक्रमी दराने विक्री. हा फ्लॅट कोणी खरेदी केला आहे. या फ्लॅटचा ताबा कधी मिळणार जाणून घेऊया सर्व काही.  

मागील 3 ते 4 वर्षात देशभरात मालमत्तेच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. दिल्ली, गुरुग्राम ते मुंबईपर्यंत 10 कोटी ते 100 कोटी रुपयां दरम्यान फ्लॅट विकले जात आहेत.  एका मोठ्या डीलची बातमी समोर आली आहे.  दक्षिण मुंबईतील वरळी भागात ही प्रॉपर्टी डील झाली आहे. 226 कोटी रुपयांना एक डुप्लेक्स अपार्टमेंट विकण्यात आले आहे.

गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आदि गोदरेज यांची मोठी मुलगी तान्या अरविंद दुबाश आणि क्लेमेंट जॉर्ज पिंटो या रिअल इस्टेट फर्ममध्ये संचालक आहेत. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म स्क्वेअर यार्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की, शौला रिअल इस्टेट्सने मुंबईतील वरळी येथील नमन झेना प्रकल्पात 225.76 कोटी रुपयांचा डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केला आहे. या अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ 11,485 चौरस फूट आहे. ज्या इमारतीत हा फ्लॅट आहे तिचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. 2027 पर्यंत पूर्ण याचे काम पूर्ण होईल. 

भारतातील हा सर्वात महागडा निवासी मालमत्तेचा करार मानला जात आहे. त्याची प्रति चौरस फूट किंमत सुमारे  2.45 लाख आहे. बिल्ट-अप एरियाच्या बाबतीत, ही किंमत प्रति चौरस फूट 1.97 लाखांच्या जवळपास आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या मते, हा व्यवहार मे 2025 मध्ये नोंदणीकृत झाला होता. या डुप्लेक्स युनिटमध्ये 856 चौरस मीटर (9,214 चौरस फूट) चा कार्पेट क्षेत्रफळ आणि 114 चौरस मीटर (1,227 चौरस फूट) चा बाल्कनी आहे. एकूण बिल्ट-अप क्षेत्रफळ 1,067 चौरस मीटर (11,485 चौरस फूट) आहे. अपार्टमेंटसोबत 6 कार पार्किंग स्पेस देखील उपलब्ध आहेत. या करारात 13.55 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.

Read More