Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

चारित्र्याच्या संशयावरून बायकोच्या नाजूक ठिकाणी जबर चावा; पोलिसांनीही ठोकल्या बेड्या

नवऱ्यासोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीला चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून बायकोच्या नाजूक ठिकाणी जबर चावा; पोलिसांनीही ठोकल्या बेड्या

मुंबई : नवऱ्यासोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीला चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा चारित्र्यावर संशय घेतो म्हणून प्रेरणा सैनीने त्यासोबत राहण्यास नकार दिला होता.

प्रेरणा सैनी या महिला आपल्या 11 वर्षीय मुलीसह मुंबईत राहत आहेत. त्यांचा नवरा विजेंदर पाल हा दिल्लीतील पहाडगंज परिसरात रिक्षा चालकाचे काम करतो. नेहमी बायकोवर संशय घेत असल्याने ती त्याला सोडून नातेवाईकांकडे मुंबईत राहायला आली होती.

प्रेरणा मुंबईत असल्याची माहिती विजेंदरने काढली. त्यानुसार तो बायकोला पुन्हा दिल्लीला घेऊन जाण्यास मुंबईत आला. बायकोची भेट झाली. विजेंदरने प्रेरणाला आपल्यासोबत दिल्लीत येण्यास सांगितले. 

प्रेरणाने नकार दिला. त्याच संतापात विजेंदरने तिच्या नाकाला जबर चावा घेतला. त्यात तीला प्रचंड दुखापत झाली. जवळच्या रिक्षाचालकाने तिला कूपर रुग्णालयात नेले. तेथे तिच्या नाकावर 15 टाके पडले.

शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी एफआयआर नोंदवून त्याला अटक आणि जामिनावर सूटका केली.

आता विजेंदर पुन्हा दिल्लीला गेला आहे. परंतु जाताना त्याने बायको प्रेरणाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

Read More