मुंबई : अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह सपडल्यामुळे या प्रकरणातील गुढ वाठलं आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याघरासमोर स्फोटकांनी भरलेली जी गाडी सापडली होती, त्या गाडीच्या मालकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पण आता ही हत्या होती की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता मनसुख हिरेन प्रकरणाला एक वेगळचं वळण मिळालं आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा यांनी याप्रकरणी ठाकरे सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले.
चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या, 'महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन...' असं ट्विट करत त्यांनी गेल्या महिन्यात घडलेल्या घटनांची सरकारला आठवण करून दिली.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 5, 2021
कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी
आणि
आता मनसुख हिरेन...
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य.....
आणि
रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी.......
सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना...?
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य दडलं आहे आणि रहस्यातून बाहेर पडत आहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी. असं म्हणतं चित्रा वाघ यांनी सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना...? असा प्रश्न उपस्थित केला आहे.