Nishikant Dubey Controversial Comment On Marathi Maharashtra People: हिंदीच्या सक्तीवरुन मराठी विरुद्ध हिंदी असा वाद राज्यात पुन्हा तापलेला असतानाच आता भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोक आमच्याच पैशांवर जगतात असं वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्राकडे ना खाणी आहेत ना उद्योगधंदे असंही निशिकांत दुबेंनी म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? तिथे टाटा-बिर्ला आहेत? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही किती टॅक्स भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, तुमच्याकडे खाणी आहेत का? सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. हिंदी भाषिकांना मारहाण करता मग इतर भाषिकांना का मारहाण करत नाहीत?" असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला आहे.
"तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? तिथे टाटा-बिर्ला, रिलायन्स आहेत? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही किती टॅक्स भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशाकडे आहेत खाणी! तुमच्याकडे खाणी आहेत का? सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. सेमी कंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये आहे. हिंदी भाषिकांना मारहाण करता मग इतर भाषिकांना का मारहाण करत नाहीत? ऊर्दू, तमिळी, तेलगु लोकांना मारहाण करा ना असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला आहे. "स्वत:च्या घरात आहात तेव्हा मोठे बॉस आहात. या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये या तिथे तुम्हाला आपटून आपटून मारु," अशी दर्पोक्ती दुबे यांनी केली आहे.
"आम्ही मराठीचा सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा आम्ही सन्मान करतो. मराठीचा सन्मान करतो. आम्हाला पेशव्यांपासून तात्या टोपेंपासून, टिळक, गोपाळ कृष्ण गोपाळ असो या सर्वांचा आम्ही सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य करण्यामध्ये मराठी स्वातंत्र्यसैनिकांचं मोठं योगदान आहे. आम्ही सर्वांचा सन्मान करतो," असं दुबे यांनी म्हटलंय.
#WATCH | Guwahati, Assam | On Raj Thackeray's remark 'beat but don't make a video', BJP MP Nishikant Dubey says, "...You people are surviving on our money. What kind of industries do you have?... If you are courageous enough and beat those who speak Hindi, then you should beat… pic.twitter.com/gRvAjtD0iW
— ANI (@ANI) July 7, 2025
"आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचं राजकारण जे उद्धव आणि राज ठाकरे जे करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्यात हिंमत असेल तर माहिमच्या दर्ग्यासमोर कोणत्याही हिंदी किंवा ऊर्दू भाषिकाला मारुन दाखवावं तेव्हा आम्ही समजू की ते खरोखर बाळासाहेबांच्या सिद्धांतावर चालत आहेत," असं दुबे यांनी म्हटलंय.