Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'सगळं अंगाशी येणार कळाल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात'

...म्हणून संजय राऊत रुग्णालयात; निलेश राणेंची जहरी टीका

'सगळं अंगाशी येणार कळाल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात'

मुंबई: सगळी नाटकं आता अंगाशी येणार आहेत, हे कळाल्यामुळेच संजय राऊत रुग्णालयात दाखल झाले आहेत, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे. निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. यानंतर निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्विट करून संजय राऊत यांना जहरी शब्दांत लक्ष्य केले. या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. 

शिवसेनेचे संजय राऊत लीलावती रूग्णालयात दाखल

सगळी वाट लावून झाली आणि आता सगळं अंगाशी येणार कळाल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात दाखल झाले आहेत. हे त्यांचे नवीन नाटक आहे. आणखी किती खालची पातळी गाठणार. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची वाट लावल्यानंतर आता राऊत दोन दिवस कोणालाही भेटणार नाही, असे म्हणतात. शिवसैनिकांनो आता तुम्हीच याचा बंदोबस्त करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

उद्धव यांची फोनवरून सोनियांशी चर्चा; वर्षा बंगल्यावर भाजपची खलबते

विधाससभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी राणे कुटुंबाला आपल्या धारदार जीभांना लगाम घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. कणकवली मतदारसंघातील भाजप उमेदवार नितेश राणे यांनी फडणवीसांचा हा सल्ला ऐकला होता. मात्र, नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र निलेश यांनी शिवसेनेवर टीका करणे सुरुच ठेवले होते. विधानसभा निवडणुकीत निलेश राणे कणकवलीतून विजयी झाल्यानंतर निलेश राणे यांनी अत्यंत कडवट शब्दांत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. वांद्र्याचा कवठ्यामहाकाळ कणकवलीत आल्यामुळे निलेश यांची २० हजार मते वाढली, असे निलेश राणेंनी म्हटले होते.

Read More