Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अमित शाहांचा मुंबई दौरा, लता मंगेशकरांची घेणार भेट

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका

अमित शाहांचा मुंबई दौरा, लता मंगेशकरांची घेणार भेट

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दादर कार्यालयात बैठकांसाठी ते उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश पदाधिकारी, प्रदेश विस्तारक, आणि त्यानंतर गोवा पदाधिकारी अशा बैठका घेणार आहेत. संध्याकाळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची अमित शहा भेट घेणार आहेत. भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या अभियाना अंतर्गत ही भेट असणार आहे.

काही दिवसांपूर्वी देखील अमित शाहा मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी रतन टाटा आणि माधुरी दीक्षित यांची भेट घेतली होती. लता मंगेशकर यांना देखील ते मागच्याच दौऱ्यात भेटणार होते पण त्यावेळी ही भेट झाली नव्हती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी यावेळी भेट घेतली होती. बंद दरवाजामागे ही भेट झाल्याने आणि अपेक्षेपेक्षा अधिक वेळ चर्चा झाल्याने ही भेट चांगलीच चर्चेत आली होती.

Read More