आप (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी देशाच्या प्रगतीसाठी देवी लक्ष्मीचा (lakshmi) आणि गणपीचा (Ganpati) फोटो भारतीय चलनावर लावण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. नव्या नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर इतर महापुरुषांचे फोटो लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे. भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो असलेली नोट ट्विटरवर पोस्ट केली आहे. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही फोटो असलेल्या नोटा पोस्ट केल्या आहेत. (bjp Ram Kadam demand to put Prime Minister Modi photo on Indian currency notes)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात भारताला बलाढ्य बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आज भारताकडे सारं जग विश्वगुरु म्हणून पाहतयं. शत्रू राष्ट्रही म्हणतात की त्यांच्या देशात नरेंद्र मोदींसारखा नेता जन्माला आला असता तर भारतासारखी प्रगती झाली असती. सारं जग ज्यांचे कौतुक करतय त्या मोदींचा त्याग आपल्याला मान्य करावेच लागेल. मी केलेलं ट्विट भारताच्या सामान्य नागरिकाची लोकभावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे," असे राम कदम म्हणाले.
हे ही वाचा : भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो? नितेश राणे म्हणाले, 'हे...'
"अखंड भारत.. नविन भारत.. महान भारत.. जय श्री राम.. जय मातादी!, असे ट्विट करत राम कदम यांनी काही महापुरुषांचे फोटो असलेल्या नोटा पोस्ट केल्या आहेत.
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
"क्षुद्र राजकारणाने प्रेरित काही राजकारण्यांनी नोटेवर देवदेवतांचे चित्र असावे, ही मागणी निवडणूक पाहून केली होती. पण ते मनापासून प्रामाणिकपणे बोलले असते तर देशाने त्यांना स्वीकारले असते.. पण त्यांचा भूतकाळ सांगतो की त्यांना फक्त निवडणुकीतच आमच्या देवतांची आठवण होते. आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर असले तरी त्यांचे चित्र देशातील करोडो लोकांना प्रेरणादायी ठरेल, हे कोणीही नाकारू शकत नाही. ते आपल्या सर्वांसाठी पूज्य आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महान बलिदान आपण कसे नाकारू शकतो," असे ट्विट राम कदम यांनी केलं आहे.
ओछी राजनीतीसे प्रेरित कुछ नेताओने देवी देवताओ की तस्वीर नोट पर होनी चाहिये यह मांग चुनाओ देखकर की..
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
किंतु वे दिल के इमानदारी से बात करते तो देश उसे स्वीकार करता .. पर उनका अतीत बताता है
की उन्हे केवल चुनाओ मे हमारे देवी देवता याद आते है .
यद्यपी हमारे महापुरुष
यावर आता भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर वाद होता कामा नये. "याबाबत पंतप्रधान मोदी काय तो निर्णय घेतील. तसेच पंतप्रधान मोदी हे सक्षम आहेत. देशासाठी अशी गरज भासली तर नरेंद्र मोदी निर्णय घेतील. जिल्ह्यात, राज्यात अशी फोटोची स्पर्धा लावणे योग्य नाही. मोदींच्या फोटोवरुन वाद होऊ नये. नरेंद्र मोदी हे देशाचे नेते आहेत आणि ते जनतेच्या हृदयात आहेत," असे प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलं आहे.