Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'2 पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून..., लाजा वाटल्या पाहिजेत', राऊतांनी ठणकावलं, घोसाळकर भावूक!

Vinod Ghosalkar Emotional: पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत असताना शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

'2 पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून..., लाजा वाटल्या पाहिजेत', राऊतांनी ठणकावलं, घोसाळकर भावूक!

Vinod Ghosalkar Emotional: मुंबई पालिकेची निवडणूक जशी जवळ येतेय तसे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पक्षाची ताकद वाढवणे, इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात एन्ट्री देणे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांना पक्षात घेण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आणि विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरही गेले. यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंची शिवसने आणि भाजपवर गंभीर आरोप केले. 

पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत असताना शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मुलाच्या आठवणीनं घोसाळकर यांना अश्रू अनावर झाले... भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून घोसाळकर कुटुंबावर दबाव असल्याचा आरोप यावेळी संजय राऊतांनी केलाय.

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी आमदार उपनेते विनोद घोसाळकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेजस्वी घोसाळकर ह्या पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर आज घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

काय म्हणाले विनोद घोसाळकर?

माझ्या सुनबाईंवर शिंदे गट आणि भाजपचा दबाव आहे. पक्ष प्रवेशासाठी आता काही दलाल निर्माण झालेले आहेत. मी वैयक्तिक कुठेही जाणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार असल्याचे विनोद घोसाळकर म्हणाले. माझी सुनबाई ही अजून शिवसेनेत आहे. तिने स्थानिक पदाचा राजीनामा दिला होता. तसेच ती उद्धव साहेबांची भेट घेऊन गेली आहे.मी सकाळी संजय राऊत यांची आणि आता उद्धव साहेबांची भेट घेतलेली आहे.आमच्या कुटुंबाबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे विनोद घोसाळकर म्हणाले. 

राऊतांनी विरोधकांना खडसावलं 

विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आणि आता उपनेते आहेत. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग झाला. त्यांच्या सूनबाई शिवसेनेतून नगरसेविका होत्या. 2 पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून, 'आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या', असे सांगत आहेत. त्यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

एका घरात तिने आपला पती गमावला आणि यांनी आपला मुलगा गमावला. त्या घरात तुम्ही असे कृत्य करत आहात? असा प्रश्न राऊतांनी विचारला. लाजा वाटल्या पाहिजेत, निर्दयी लोक आहेत. आमचा विषय आम्ही बघू. ते पक्षात आहेत पक्षाबरोबर आहेत आणि त्यांची सूनबाई सुद्धा पक्षात असल्याचे राऊत म्हणाले.

Read More