Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मराठा आरक्षणासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरु

भाजप आणि शिवसेनेने सर्व आमदारांना जारी केला व्हिप

मराठा आरक्षणासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरु

मुंबई : मराठा आरक्षणाच्या विधेयकासाठी भाजपनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अधिवेशनाचे अखेरचे तीन दिवस शिल्लक असताना भाजपनं आपल्या आमदारांना व्हीज जारी केला असून पुढचे तीन दिवस हजर राहण्याची सक्ती केली आहे. तसंच दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर काही क्षणातच शिवसेनेनंही आपल्या आमदारांना पुढचे तीन दिवस हजर राहण्याचा व्हीप जारी केला.

गटनेत्यांच्या बैठकीत मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळात मांडण्याबाबत विरोधकांनी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे विधेयक मांडतांना अडचणी येऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंशी थेट मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले मराठा आरक्षण विधेयक येत्या २९ तारखेला सभागृहात मांडले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे आज मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मांडण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात आजही गदारोळ बघयाला मिळाला.

आज विधानपरिषदेतल्या गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. घोषणाबाजी झाली पण ते मैत्रीपूर्ण असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अनेक आमदारांच्या चेहऱ्यावरचं हसू कॅमेरात चित्रित झालं. आज सकाळपासून विधानपरिषदेत मागासवर्गीय अहवाल मांडण्याच्या मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला. वारंवार होणाऱ्या गोंधळानं कामकाज तहकूब होत गेलं. अखेर दिवसभराचं कामकाज पाण्यात गेलं.

 

Read More