Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

दहिसरच्या ठाकूर मॉलबाहेर संशयास्पद वस्तूचा स्फोट, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथकही दहिसरमध्ये दाखल झाले आहे.

दहिसरच्या ठाकूर मॉलबाहेर संशयास्पद वस्तूचा स्फोट, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

मुंबई: पश्चिम द्रुतगती मार्गालगत असणाऱ्या ठाकूर मॉलबाहेर बुधवारी स्फोट झाला. त्यामुळे दहिसर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर फॉरेन्सिक आणि बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून या स्फोटाचा तपास सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी ठाकूर मॉलच्या बाहेर अचानकपणे हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दहशतवादी कृत्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून तातडीने हालचाली सुरु झाल्या आहेत. हा स्फोट नक्की कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथकही दहिसरमध्ये दाखल झाले आहे. 

Read More