Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

महापालिका अधिकाऱ्यांकडून बंगल्याचं मोजमाप, नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करणार?

केंद्रीय मंत्री नारायण यांच्या यांच्या जुहू येथील बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिकेने नोटीस पाठवल्यानंतर आता अधिकारी ही राणेच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांकडून बंगल्याचं मोजमाप, नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करणार?

मुंबई : मुंबई महापालिकेकडून (BMC Officers) नारायण राणेंच्या (Narayan Rane) जुहू येथील बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्याकरता बीएमसी अधिकारी दाखल झाले होते. के वेस्ट वॉर्ड कडून नारायण राणे यांना नोटीस देण्यात आली होती. 2017 मध्ये नारायण राणेंच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार आली होती. (BMC Officers at Narayan Rane's Juhu banglow)

या बंगल्याचे बांधकाम सिआरझेडचे उल्लंघन असल्याबाबत तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली होती.

महापालिका अधिकारी 20 मिनिटात राणेच्या बंगल्यातून बाहेर आले. सोमवारी पुन्हा कारवाई होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी झी मीडियाला दिली. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या बंगल्यावर कायदेशीर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नारायण राणे यांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी तरी अजून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राणे काय बोलणार याकडे ही लक्ष लागून आहे.

Read More