Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत भयानक अपघात! बेस्ट बसखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

मुंबईच्या बोरीवली परिसरात भीषण अपघात झाला आहे. 3 वर्षाच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू झाला आहे. 

मुंबईत भयानक अपघात! बेस्ट बसखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Borivali Best Bus Accident : मुंबईत एक भयानक अपघात झाला आहे.  बेस्ट बसखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या बोरीवली परिसरात हा अपघात घडला आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. 
बोरिवली मध्ये बेस्ट खाली चिरडून एका तीन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटना समोर आली आहे. महक असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.  तीन वर्षाची महक ही आपल्या भावासह बोरिवली मध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी असलेल्या राजेंद्र नगर ब्रिज वर ट्रॅफिक मधून रस्ता ओलांडत होती. 

यावेळी बस अचानक समोर आली आणि मेहक बसच्या पुढच्या चाकाखाली चिरडली गेली.  गंभीर जखमी झालेल्या महक मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान कस्तुरबा पोलिसांनी या प्रकरणात बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. 

चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात

अंबरनाथच्या लोकनगरी रस्त्यावर एका टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला दोन दुचाकींना धडक दिली आहे. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.  लोकनगरीकडून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपासमोर आज सायंकाळी हा अपघात झाला. एक मालवाहू टेम्पो एमआयडीसीच्या दिशेने निघालेला असताना एस्सार पेट्रोल पंपासमोरील अनधिकृत गाळ्यांमध्ये आलेल्या ग्राहकांच्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या दुचाकींना टेम्पोने धडक दिली. यात कुणालाही इजा झालेली नसली, तरीही तिन्ही वाहनांचं मात्र नुकसान झालं आहे. 

 

Read More