Business News Taj Hotel : देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या हॉटेल व्यवसायाची साखळी म्हणून नावाजलेल्या ताज हॉटेल (Taj Hotel) समुहावर सध्या कौतुकाता वर्षाव होत आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे या समुहानं मिळवलेलं यश. ताज हॉटेल्स चालवणाच्या अर्थात या समुहाच्या कार्यकारिणी आणि व्यवस्थापनावर लक्ष ठेवणाऱ्या इंडियन होटल्स कंपनी लिमिटेड (IHCL) नं तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप अर्थात कंपनी मूल्य गाठत असं करणारी ही पहिली भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी ठरली आहे. ज्यामुळं शेअर मार्केटपासून ते अगदी हॉटेल व्यवसायाच्या क्षेत्रापर्यंत फक्त आणि फक्त ताज हॉटेल्सचीच चर्चा सुरू आहे.
मुंबईतील अपोलो बंदर इथं अतिशय दिमाखात असणाऱ्य हॉटेल ताजच्या ऐतिहासिक इमारतीत एकदातरी मुक्काम करणं हे अनेकांचच स्वप्न असतं. काहीचं हे स्वप्न साकार होतंही, पण काहीजण बाहेरूनच या सुरेख ठिकाणाला न्हाहाळताना दिसतात.
आजच्या घडीला उपलब्ध आकडेवारी आणि सध्याच्या दरानुसार द ताज महाल पॅलेसमधील सर्वात महागड्या रुममध्ये मुक्काम करण्यासाठी तब्बल आठ लाख रुपयांचा खर्च येतो. तर, हॉटेलच्या इतर रुमच्या किमती खालीलप्रमाणे...
वरील रुमव्यतिरिक्त हॉटेलमध्ये लक्झरी रुम, लक्झरी ग्रँड रुम सिटी व्ह्यू, , लक्झरी ग्रँड रुम सी व्ह्यू, सिग्नेचर सुईट आणि द टाटा सुईट अशा अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या रुमसुद्धा उपलब्ध आहेत.
आजच्या घडीला जरी इथं मुक्कामासाठी हजारो आणि लाखो रुपये मोजावे लागत असले तरीही 1903 मध्ये मात्र या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 6 रुपये इतका खर्च यायचा असं सांगितलं जातं. फक्त मुंबईच नव्हे तर देशात आणि अगदी परदेशातही ताज हॉटेल्सची साखळी सक्रिय असून, तिथंही कमाल सुविधा देत येणाऱ्यांचा पाहुणचार केला जातो. मात्र, मुंबईतील ताजची बातच काही और... नाही का?