Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सलमान खानवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी पाठवलं समन्स

व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सलमान खानला समन्स पाठवलं आहे. त्याचं उत्तर 10 दिवसात देणं अपेक्षित आहे

सलमान खानवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी पाठवलं समन्स

मुंबई : अभिनेता सलमान, त्याची बहिण अलवीरा आणि त्यांच्या बिईंग ह्युमन कंपनीविरुद्ध (Being Human) एका व्यापाऱ्याने फसवणुकीचा आरोप केला आहे. 'बीइंग ह्युमन' कंपनीचं शोरूम सुरु केल्यानंतर कंपनीकडून शोरुमसाठी कोणतंही सामान पाठवण्यात आलेलं नाही असा आरोप या व्यापाऱ्याने केला आहे. इतकंच नाही तर कंपनीची वेबसाईटही बंद असल्याची तक्रार या व्यापाऱ्याने केली आहे.

या प्रकरणात चंदिगढ पोलिसांनी सलमान, अलवीरा यांसोबत 'बीइंग ह्युमन' कंपनीचे सीइओ आणि 6 कर्मचाऱ्यांना समन्स बजावलं आहे. 

अरुण गुप्ता या व्यापाऱ्याने सलमान खान याच्या सांगण्यावरुन चंदीगडमधल्या एनएसी परिसरात 3 करोड रुपयांची गुंतवणूक करत बीईंग ह्यूम ज्वेलरीचं शोरूम सुरु केलं. शोरूम सुरू करण्यासाठी 'स्टाइल क्विंटेट ज्वेलरी' यांच्यासोबत एक करार देखील करण्यात आला. पण शोरूम सुरु केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं साहित्य पुरवण्यात आलं नाही. ज्या दुकानातून बीइंग ह्युमन ज्वेलरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, ते दुकान देखील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे, असा आरोप या व्यापाऱ्याने केला आहे.

याप्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन चंदिगढ पोलिसांनी सलमान खानला समन्स पाठवलं आहे. त्याचं उत्तर 10 दिवसात देणं अपेक्षित आहे. व्यापाऱ्याच्या म्हणण्यानूसार सलमान खानने त्यांना बिग बॉसच्या सेटवर बोलावलं होतं, आणि शोरुम उघडण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. या व्यापाऱ्याने पोलिसांना एक व्हिडीओही पाठवला असून सलमान खानने त्याच्या शोरूमच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं सांगितलं होतं. पण वेळ नसल्याने सलमान त्याठिकाणी जाऊ शकला नाही.

 

 

Read More