Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सीडीआर प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अडचणीत

ठाणे सीडीआर प्रकरणी ख्यातनाम सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा देखील अडचणीत सापडलाय. ठाणे गुन्हे शाखेनं सिद्दीकी विरोधात समन्स बजावलं असून, तो आज पोलिसांपुढं हजर राहण्याची शक्यता आहे.

सीडीआर प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अडचणीत

ठाणे : ठाणे सीडीआर प्रकरणी ख्यातनाम सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा देखील अडचणीत सापडलाय. ठाणे गुन्हे शाखेनं सिद्दीकी विरोधात समन्स बजावलं असून, तो आज पोलिसांपुढं हजर राहण्याची शक्यता आहे.

आपल्या वकिलामार्फ़त एका व्यक्तीचा सीडीआर मागवल्याप्रकरणी सिद्दीकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत ख्यातनाम डिटेक्टिव्ह रजनी पंडितसह अनेकांना अटक करण्यात आली आहे.
 
दरम्यान, आता सिनेमाच्या पडद्यावर ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचं नावही पुढं आल्यानं या प्रकरणातलं गांभीर्य आणखी वाढलंय.

Read More