Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Tata Cancer Hospital : कॅन्सर रुग्णांसाठी मोठी बातमी, मुंबईत दुसरे टाटा कॅन्सर हॉस्पिटल

Tata Cancer Hospital : मुंबईत आता आणखी एक टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुरु होणार आहे. त्यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. हाफकिन संस्थेच्या 5 एकर जागेवर हे हॉस्पिटल उभे राहणार असून त्याच्या बांधकामासाठी 800 कोटी रुपये देण्यात येणार आहे. 

Tata Cancer Hospital : कॅन्सर रुग्णांसाठी मोठी बातमी, मुंबईत दुसरे टाटा कॅन्सर हॉस्पिटल

Tata Cancer Hospital : कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी. मुंबईत आता आणखी एक टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुरु होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कॅन्सर रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. हाफकिन संस्थेच्या 5 एकर जागेवर हे 17 मजली हॉस्पिटल उभे राहणार आहे. 

येत्या महिन्याभरात नव्या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होणार असून 4 वर्षात हे हॉस्पिटल सुरु होईल. केंद्र सरकारच्या अणूऊर्जा विभागाकडून हॉस्पिटलच्या बांधकामासाठी 800 कोटी रुपये उपलब्ध करण्यात येतील. सध्या परळमध्ये असलेल्या टाटा हॉस्पिटलमध्ये दरवर्षी साडेचार लाख रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता हे हॉस्पिटलही अपूरं पडत आहे.

या नवीन सुविधेमुळे राज्यातील तसेच उपनगरातील अनेक रुग्णांना पर्याय मिळणारआहे. टाटा रुग्णालयावर आधीच रुग्णांचा ओझे आहे. हे नवीन कॅन्सर रुग्णालय हा आता लोकांना दुसरा पर्याय उपलब्ध असेल. 

नवीन हॉस्पिटल कसं असेल?

- हाफकिनच्या 5 एकर जागेवर 17 मजली हॉस्पिटल
- रुग्णांसाठी 580 बेड्स, केमोथेरपी रुग्णांसाठी 100 बेड्स राखीव
- मोठ्या शस्त्रक्रियांसाठी 15 ऑपरेशन थिएटर
- छोट्या शस्त्रक्रियांसाठी 6 ऑपरेशन थिएटर
- डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान

Read More