Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

रविवारी प्रवाशांचा खोळंबा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या

Mumbai Local Update: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

रविवारी प्रवाशांचा खोळंबा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या

Mumbai Local Update: रविवारी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. 

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

कुठे असेल मेगाब्लॉक

कुठून कुठपर्यंत: सीएसएमटी  ते विद्याविहारपर्यंत मेगाब्लॉक असणार
 
कोणत्या मार्गावर: अप आणि डाऊन धीम्या 

कधी: रविवारी 

किती वाजता: सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ 

परिणाम: ब्लॉक कालावधीत मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध नसणार आहेत. 

हार्बर मार्गावर

कोठून कुठपर्यंत: ठाणे आणि वाशी /नेरूळ दरम्यान 
कोणत्या मार्गावर? : अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर 
कधी? : रविवारी 
किती वाजता? : सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10
परिणाम ?: ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी / नेरूळ / पनवेल दरम्यान डाऊन आणि अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

Read More