Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात; बायोमेट्रिक हजेरीला मोटरमनचा विरोध

मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात; बायोमेट्रिक हजेरीला मोटरमनचा विरोध

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमनवर दबाव टाकण्याचे सत्र सुरूच आहे. सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून मोटरमनवर वॉच ठेवला जात असतानाच आता बायोमेट्रिक हजेरीसाठी दबाव टाकला जात आहे. सकाळी गाडी कुठूनही सुटू दे, आधी बायोमेट्रिक हजेरीसाठी सीएसएमटी मुख्यालयात यावे, अशा सूचना मोटरमनला करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या नव्या दबावतंत्राविरोधात मोटरमन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. मोटरमन संघटनेनं आंदोलन पुकारल्यास मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 

 

Read More