Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; मोटरमन संघटनेचा 'तो' निर्णय अखेर मागे

Central Railway: मध्य रेल्वेच्या मोटरमनने पुकारलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; मोटरमन संघटनेचा 'तो' निर्णय अखेर मागे

Central Railway: मध्य रेल्वेच्या मोटरमननी आज पुराकरेला संप अखेर टळलाय. लोकलच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास काम करताना ताण वाढेल. त्यामुळे त्या निर्णयाचा निषेध करत मोटरमननी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, सकारात्मक चर्चेमुळे संप न पुकारण्याचा निर्णय मोटरमन संघटनांनी घेतला आहे. 

मध्य रेल्वेच्या मोटरमननी संप पुकारला असता तर त्याचा परिणाम थेट लोकल सेवेवर झाला असता. रविवारी सुरू झालेला संप सोमवारपर्यंत चालला असता तर लोकल सेवा कोलमडली असती. मात्र सकारात्मक चर्चेमुळे संप न पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं लोकल सेवेवर त्याचा थेट परिणाम होणार नाहीये. 

मध्य रेल्वेच्या मोटरमननी लोकल केबिनमध्ये सीसीटीव्ही तसेच अतिरिक्त सेवा करण्यास विरोध दर्शवत रविवारी संपाची हाक दिली होती. मात्र, रेल्वे प्रशासन आणि संघटनांमध्ये शनिवारी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा निघाला. या बैठकीत मोटरमनच्या विविध मागण्या समजून घेत रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळं आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नीट परीक्षेमुळे मेगाब्लॉक रद्द

नीट-2025 परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने रविवारी कोणताही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत, सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच, पश्चिम रेल्वेवरही रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल – माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे 4.15 पर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे 

Read More