Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Good News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे

गिरणी कामगारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी.  

Good News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे

मुंबई : गिरणी कामगारांसाठी दिलासादायक बातमी. गिरणी कामगारांना निम्या किमतीत घरे मिळणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगार शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. १ मार्च २०२० पासून गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. स्वस्तात घरे देण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना आता साडेनऊ लाखांतच घर मिळणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना आश्वासन दिल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली. गिरणी कामरांच्या घरांची किंमत वाढून १८ लाख रुपये होणार होती. मात्र ही गिरणी कामगार एवढी महाग घरं घेऊ शकत नाही. यासंदर्भात गिरणी कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्र्यांनीच घर साडेनऊ लाखांत उपलब्ध होतील, असे म्हटले आहे.

0

Read More