Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

चेंबूर आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू, 2 जखमी

चेंबुरमध्ये 15 मजली इमारतीला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. 

चेंबूर आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू, 2 जखमी

मुंबई : चेंबुरमध्ये 15 मजली इमारतीला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली आहे. यामध्ये जळून खाक झाले आहे. टिळकनगरमधील सरगम सोसायटीला ही आग लागली आहे. रात्री ८ वाजता ही घटना घडली.  या भीषण आगीमध्ये 2 जण जखमी झाले असून 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन जवानांना यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.  नीता जोशी (72 वर्षे), भालचंद्र जोशी (72 वर्षे) सुमन श्रीनीवास जोशी (83 वर्षे) सरला सुरेश गंगर (52 वर्षे), लक्ष्मीबेन प्रेमजी गंगर (83 वर्षे) अशी मयतांची नावे आहेत. श्रीनीवास जोशी (86 वर्षे), छगन सिंग, फायरमॅन (28 वर्षे) हे दोघे जखमी झाले आहेत. 

Read More